Saturday, April 12, 2025
Homeशिक्षक हितशाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील पहिला मेळावा आयोजन करणे.

शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील पहिला मेळावा आयोजन करणे.

 

शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील पहिला मेळावा आयोजन करणे.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद  महाराष्ट्र पुणे

शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळास्तरावरील पहिला मेळावा आयोजन करणे.

जुन २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान / उपक्रम अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यस्तर संसाधन गटाचे प्रशिक्षण तसेच विभागस्तरतालुकास्तर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व केंद्र स्तरावरील शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. उपक्रमाच्या पुढील टप्यावर शाळास्तरावरील शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ चे आयोजन करावयाचे आहे. सदरील शाळा स्तरावरील पहिल्या मेळाव्याचे आयोजन दि. ११ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत करण्यात यावे. या कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी जिल्ह्यातील सर्व जि.प.म.न.पा.व न.पा. शाळांमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.

शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे :

१. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागप्रशासन अधिकारी-म.न.पा. व न.पा. व ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणे बाबतचे नियोजन शाळांना व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना कळवावे.

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

३. मेळावा आयोजन करीत असताना मेळाव्याबावत वस्तीगाव स्तरावर प्रभातफेरीदवंडी देवूनसमाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी. व त्यामाध्यमातून पुढील वर्षी जून २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दखलपात्र असलेल्या सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे.

४. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत.

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),

३) बौद्धिक विकास,

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,

५) भाषा विकास,

६) गणनपूर्व तयारी,

७) पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन

या प्रमाणे स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर केल्या जातील व बालकांची शाळापूर्व तयारी घरी करून घेण्यासाठी शाळापूर्व तयारीचे साहित्य सातव्या स्टॉलवर पालकांना वितरीत करण्यात येईल.

५. बालकांच्या शाळापूर्व तयारीसाठी पालकांना वितरीत करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे मेळावा क्रमांक १ ते मेळावा क्रमांक २ च्या दरम्यान साधारणपणे ८ ते १० आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी घरी करून घ्यायची आहे. या करिता प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार शिक्षकअंगणवाडी सेविका व स्वयंसेवक हे पालकांना सहाय्य करतील.

६. मेळावा आयोजनासंदर्भातील सांख्यिकी माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी येथे क्लिक करा

 या लिंकवर भरावी.

७. शाळापूर्व तयारी अभियानासाठी सहकार्य करणारे स्थानिक शिक्षित मुले / मुली (किमान ५ स्वयंसेवक) यांची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी येथे क्लिक करा  या लिंकवर भरावी.

८. शाळा स्तरावरील मेळाव्यामध्ये बालके व पालकांना वितरित करावयाचे साहित्य वितरित करण्यात आले आहे. मेळावा आयोजनापूर्वी उपक्रमाचे साहित्य तालुका स्तराहून केंद्रावर व तेथून सर्व शाळांना वितरीत झाल्याची खात्री प्राधान्याने करण्यात यावी.

९. मेळाव्या संदर्भातील फोटोव्हिडिओ इ. माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan2022 #शाळापूर्वतयारी अभियान 2022 व #ShalapurvaTayari2022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert  या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

१०. जून २०२२ मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये बालकांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक २ चे आयोजन करण्यात यावे. किंवा शाळा सुरु झाल्यावर पहिल्या आठवड्यात शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. २ चे आयोजन करता येवू शकेल. त्या अनुषंगाने आवश्यक सविस्तर सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.

वरील प्रमाणे शाळा स्तरावर पहिल्या मेळाव्याचे नियोजन व आयोजन करण्यात यावे.

सोबत: मेळावा उपस्थिती नमुना साठी येथे क्लिक करा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!