Friday, April 18, 2025
Homeलाभाच्या योजनामाध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

 माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

उदिष्ट :- 
           इयत्ता ५ वी ते ७ वी मधील २ गुणवत्ता धारक मागासवर्गीय विद्यार्थ्याना तसेच इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या पहिल्या २ मागासगर्वीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते.
 
अटि व शर्ती :-

१. मान्यताप्राप्त प्राथमिक/ माध्यमिक शाळेतील इ. ५ वी ते १० वीच्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी असावा.

२. ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परिक्षेत कमीत कमी ५० % व त्याहुन अधिक गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यामधुन प्रथम व व्दितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्याना मंजुर करण्यात येईल.
३. या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्याना उत्पन्नाची अट राहणार नाही.
४. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शाळेतील नियमित हजेरी समाधानकारक प्रगती व चांगली वर्तणूक असल्यास मंजूर करण्यात येईल.
५. ही शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या कालमर्यादे पुरतीच म्हणजेच जून ते मार्च या १० महिन्यासाठी मंजुर करण्यात येईल.
६.शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्याना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
७. ही शिष्यवृत्ती मंजुर करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतून गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्याची माहिती मागविण्यात येईल.
८. सदरहू शिष्यवृत्ती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद मंजूर करतील.
शिष्यवृत्ती स्वरुप :- अनुसूचित जाती विद्यार्थीसाठी
इ. ५ वी ते ७ वी – रु.५०/- दर महा १० महिने रु ५००/-
इ. ८ वी ते १० वी रु.१००/- दर महा१० महिने रु १,०००/-
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!