Deprecated: Optional parameter $limit declared before required parameter $default_limit is implicitly treated as a required parameter in /home/u648549124/domains/rudratech24.com/public_html/wp-content/plugins/hostinger-affiliate-plugin/src/Shortcodes/ShortcodeManager.php on line 80
आंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यास शासनाचे ग्रीन सिग्नल - RudraTech
Saturday, April 5, 2025
Homeशिक्षक बदलीआंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यास शासनाचे ग्रीन सिग्नल

आंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यास शासनाचे ग्रीन सिग्नल

आंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यास शासनाचे ग्रीन सिग्नल!!



आपल्या शिक्षकांमध्ये जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत मागील दोन वर्षापासून उत्सुकता आहे की, बदल्या कधी होणार, कशा होणार, आपल्याला आपले सोयीचे गाव मिळणार की नाही  इ. शासनाने पण मागच्या वर्षीपासून बदल्या पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी व सर्व शिक्षकांचे व संघटनांचे हित लक्षात घेता एक नवीन शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण निश्चित केलेले आहे व या नवीन धोरणानुसार बदल्या पारदर्शक होण्यासाठी ‘विन्सी’ पुणे स्थित सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंपनीला शासनाच्या बदली धोरणानुसार आंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम देण्यात आलेले आहे व मागील एका वर्षापासून ही कंपनी सातत्याने सॉफ्टवेअरच्या निर्मितीत लागलेली आहे व सॉफ्टवेअर चे काम आता अंतिम टप्प्यात आहे. ‘विंसी’ कंपनी व शासनाच्या म्हणण्यानुसार आपल्या आंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या पूर्णता मानवी हस्तक्षेप विरहित होणार आहेत म्हणजेच या ठिकाणी ब्लॉकचेन या क्रिप्टो करेंसी क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर Covid-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील दोन वर्षापासून सर्वच विभागाच्या  वर्ग-3 व वर्ग-4 च्या बदल्यांना तसेच शिक्षण विभागातील जिल्हा अंतर्गत बदल्या व आंतरजिल्हा बदल्यांना  स्थगिती दिलेली होती. परंतु आता कोवीड-19 ची तीव्रता कमी झाल्यामुळे आता बदल्या करणास हरकत नसल्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि.23/05/2022 रोजी सर्व बदल्यांवरील निर्बंध उठवण्याचे घोषित केले आहे.

 ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-2005’ नुसार सन 2005 पासून दरवर्षी बदली प्रक्रिया राबवण्यास शासन कटिबद्ध आहे परंतु Covid-19 च्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सदर अधिनियमाला स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती आता शासनाने दि.23/05/2022 च्या पत्रकान्वये उठवलेली आहे.त्यामुळे आंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदल्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे फक्त आता अपेक्षा आहे ती आपल्या शिक्षण विभागाने व ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर संबंधित कंपनीकडून सॉफ्टवेअर लवकर तयार करून बदली प्रक्रियेला सुरुवात करण्याची अपेक्षा करूया ही प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर सुरु होईल.

सर्व बदलीपात्र शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा!!


आपल्या माहितीसाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-2005’ प्रत.👇🏻


WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!