Deprecated: Optional parameter $limit declared before required parameter $default_limit is implicitly treated as a required parameter in /home/u648549124/domains/rudratech24.com/public_html/wp-content/plugins/hostinger-affiliate-plugin/src/Shortcodes/ShortcodeManager.php on line 80
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जीवन परिचय - RudraTech
Sunday, April 6, 2025
Homeचांगले लेखगुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जीवन परिचय

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जीवन परिचय

 


प्रारंभिक जीवन :-

                        रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 ला कोलकात्यातील जोडासाको ठाकूरवाडी या गावातील एका प्रसिद्ध बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ टागोर व आईचे नाव शारदाबाई होते. ते आपल्या आई वडिलांच्या 13 अपत्यामध्ये सर्वात लहान होते. लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. देवेंद्रनाथ टागोर हे ब्रह्म समाजाचे वरिष्ठ नेता व त्यांच्या परिसराचे प्रमुख होते. त्यांना आपल्या कामानिमित्त नेहमी प्रवास करावा लागत असे. ज्यामुळे लहान रवींद्रनाथ टागोर यांचे पालनपोषण त्यांच्या नोकरांनी केले.

रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षण :-

                                                    अभ्यासात त्यांची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकात्यातील सेंट जेवियर या शाळेत झाले. टागोरांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी बॅरिस्टर बनावे. परंतु रवींद्रनाथ टागोर यांनी आवड साहित्यात होती. 1878 साली बॅरिस्टर ची डिग्री मिळवण्यासाठी, त्यांच्या वडिलांनी त्यांचा प्रवेश लंडनमधील विश्व विद्यालयात केला. परंतु बॅरिस्टर च्या आभ्यासात आवड नसल्याने 1880 साली ते डिग्री न घेताच परत आले.

इंग्लंड मधून भारतात परत आल्यावर त्यांनी विवाह करून सिआल्द येथे आपल्या इस्टेट वर काही वर्ष घालवले. त्यांनी दूर दूर पर्यंत पसरलेल्या आपल्या इस्टेटीचे प्रमाण केले. ग्रामीण व गरीब लोकांचे जीवन जवळून पाहिले. 1891 ते 1895 या कालखंडात त्यांनी ग्रामीण बंगालच्या पृष्ठभूमीवर आधारित अनेक लघु कथा लिहिल्या.
वर्ष 1901 साली रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनला गेले. येथे त्यांनी एक ग्रंथालय, शाळा व पूजा स्थळाचे निर्माण केले. त्यांनी येथे अनेक झाडे लावून सुंदर बगीचा तयार केला. येथेच काही दिवसानंतर त्यांची पत्नी व मुलांची मृत्यू झाली. त्यांचे वडिलांचे ही 1905 साली निधन झाले.
रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पुरस्कार देणारी संस्था स्वीडिश अकॅडमी ने त्यांचे काही अनुवाद व गीतांजली या ग्रंथाच्या आधारवर त्यांना हा पुरस्कार दिला. इंग्रज शासनानेही 1915 साली त्यांना ‘नाईट हुड’ ची उपाधी दिली. परंतु जालियनवाला बाग हत्याकांड नंतर त्यांनी ही उपाधी परत केली.


रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्यातील कार्य :-

                                                                       रवींद्रनाथ टागोर जन्मजात बुद्धिमान होते. एक महान कवी, साहित्यिक, लेखक, चित्रकार आणि समाजसेवी होते. सांगितले जाते की बाल्य काळात त्यांनी आपली पहिली कविता लिहिली होती. ज्या वेळी त्यांनी पहिली कविता लिहिली तेव्हा त्यांचे वय मात्र 8 वर्ष होते. 1877 साली सोळा वर्षाच्या वयात त्यांनी लघुकथा लिहून टाकली. रवींद्रनाथ टागोर यांनी जवळपास 2230 गीत लिहिले. ते भारतीय संस्कृतीत व विशेषतः बंगाली संस्कृतीत विशेष योगदान देणारे साहित्यिक होते.

टागोरांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे 4 वर्ष दीर्घ आजार व दुःखात घालवले. 1937 सालाच्या शेवटी त्यांची अवस्था आणखीनच बिघडली. परंतु ते वाचावले. याच्या जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अशीच अवस्था निर्माण झाली. या नंतर ते जेव्हाही चांगले होत असत तेव्हा कविता लिहित असत. या काळात त्यांनी एकाहून एक सुंदर कविता लिहिल्या. दीर्घ आजारानंतर 7 ऑगस्ट 1941 ला कोलकात्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. टागोरांना आपल्या आयुष्यात बऱ्याचदा सन्मानित करण्यात आले. यातील सर्वात प्रमुख गीतांजली ग्रंथासाठी 1913 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांनी भारत व बांगलादेश साठी राष्ट्र गीत लिहिले. आज भारताचे राष्ट्र गीत जन गण मन हे प्रत्येक महत्त्वपूर्ण वेळी गायीले जाते. ह्या राष्ट्रगीताचा लेखात रवींद्रनाथ टागोर आहेत. या शिवाय बांगलादेशाचे राष्ट्रीय गीत ‘आमार सोनार बांग्ला’ हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिले आहे.या शिवाय रवींद्रनाथ टागोर आपल्या आयुष्य तीन वेळा अल्बर्ट आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञांनाही भेटले. ते रवींद्रनाथ टागोरांना ‘रब्बी टागोर’ म्हणत असत.

@RudraTech

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!