मातृभाषेचे ऋण

1
96

मातृभाषेचे ऋण

माणूस जन्माला येतो तोच मुळी माथ्यावर अनेकविध ऋणांचीओझे घेऊनच. त्या अनेक ऋणांपैकी एक न फेडता येणारे ऋण म्हणजे मातृभाषेचे ऋण.अशी कल्पना करा की माणसाला मातृभाषा गवसली नसती तर त्याने काय केले असते. बाळाने आईजवळ आपला हट्ट कसा काय व्यक्त केला असता. आपल्या भावना वेदना आपल्याला हवे नको इत्यादी व्यक्त करण्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला असता.
बाळाला त्याच्या आई-बाबांकडून आजोबा कडून मातृभाषेचा वसा लाभतो.बाळ पाळण्यात असते तेव्हा त्याच्या कानावर अंगाईगीत पडते ते त्याच्या आईच्या भाषेतूनच. तो चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकतो त्याही मातृभाषेतूनच.मग आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या बोबड्या बोलातून तो गाऊ लागतो.चांदोबा चांदोबा भागलास का अशी ही मातृभाषा आपणाला आपल्या जन्मापासून सदैव सोबत करते.
व्यक्तीच्या जीवनात मातेचे व मायभूमीचे जेवढे महत्त्व असते तेवढीच त्याच्या मातृभाषेची असते.कारण मातृभाषा त्याच्यावर सुयोग्य संस्कार करत असते या संस्कारातून त्याचे व्यक्तिमत्व विकसित होते.फुलते संपन्न होते. ज्ञानदेवांनी मातृभाषेचे हे सामर्थ्य जाणले होते. म्हणुनच त्यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान मराठीतून सांगण्याचा संकल्प सोडला. नाथांना मातृभाषेची ही थोरवी कळली होती म्हणून तर त्यांनी समाजाचा विरोध सहन करूनही मातृभाषेतच काव्यरचना करण्याचा आग्रह धरला.मातृभाषेतून आपले विचार रोखठोकपणे व विलक्षण तळमळीने व्यक्त करून तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली आणि समाजप्रबोधनासाठी समर्थांना देखील ही मातृभाषाच उपयोगी पडली.
मातृभाषेतून आपल्या विचारांचे व भावनांचे आदानप्रदान सहजपणे करता येते.म्हणून मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असले पाहिजे. आपण जेव्हा कोणत्याही विषयासंबंधी विचार करतो.तो मातृभाषेतूनच करतो मात्र परक्या भाषेतून शिक्षण घेतांना ती भाषा अभ्यासण्यात आपली शक्ती नाहक खर्च होते.आजची प्रगत शास्त्रे व त्याची परिभाषा आपण आपल्या मातृभाषेत आणू शकणार नाही ही आपली विचारसरणी निराधार आहे अनुभवणे उध्वस्त केलेल्या जपान सारख्या राष्ट्राने देखील आपली प्रगती आपल्या मातृभाषेतूनच साधली.कोणत्याही परकीय भाषेचा पांगुळगाडा त्यांनी पत्करला नाही. येथे प्रश्न निर्माण होतो आम्हाला मातृभाषेचा अभिमान आहे का आपल्या देशाचा आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत विकास आपणास साधायचा असेल तर मातृभाषेचे ऋण मान्य पाहिजे व या मातृभाषेतील थोर ठेवा जतन केला पाहिजे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here