Sunday, April 6, 2025
Homeचांगले लेखआपल्या लेकरांच्या घासातील एक घास बालसुसंस्कार शिबीरांतील लेकरांच्या मुखांत घाला!

आपल्या लेकरांच्या घासातील एक घास बालसुसंस्कार शिबीरांतील लेकरांच्या मुखांत घाला!

आपल्या लेकरांच्या घासातील एक घास बालसुसंस्कार शिबीरांतील लेकरांच्या मुखांत घाला!

समाज बिघडला अशी साऱ्यांचीच तक्रार आहे मग या समाजाला घडवणार कोण? माझ्या अस्वस्थ मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा मला एक आशेचा किरण दिसला.
अगदी कोवळ्या वयांत मुलांच्या मनावर जे चांगले वाईट संस्कार घडतात त्यानुसार आपली मुल चांगली किंवा वाईट घडत असतात.बदलत्या जिवनशैलीमुळे व आईवडीलांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे काय घडु शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काल पुण्यात घडलेल्या एका बिल्डर उच्चभ्रू कुटुंबातील अतिलाडाने वाया गेलेल्या मुलाचे देता येईल. वाया गेलेल्या व समाजासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या अशा अनेक मुलांची उदाहरणे देता येतील.परंतु कालची घटणा अगदी ताजीच असल्यामुळे हे उदाहरण मी दिले
आपल्या वाया गेलेल्या मुलाने मद्यप्राशन करुन दोन निरपराधांचा जिव घेतला ही बाब अत्यंत क्लेशदायी व चिंताजनक आहे.पैसा कमावण्याच्या नादांत आपल्या मुलाकडे दुर्लक्ष झाल्याने व योग्य संस्कार न दिल्यामुळे हा प्रकार घडला हे स्पष्टच आहे.
आईवडीलच जर संस्कारी नसतील तर ते मुलांना संस्कार कसे देतील? घडलेल्या वाईट प्रकारापासून आईवडीलांनी व समाजातील जाणत्या लोकांनी काही बोध घेतला पाहिजे.
खरे तर सुसंस्कार हे घरातूनच व्हायला हवेत परंतु आईवडीलच सुसंस्कारी नसल्यामुळे व केवळ सुखासीन जगण्याच्या हव्यासापाई जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारे वाया गेलेली संतान स्वतः च्या कुटुंबासाठी व समाजासाठी तापदायक ठरत आहे.
या सगळ्या पृष्ठभुमीवर विचार करता भांगेच्या वनांत काही तुळसीची झाडे असावीत असी समाजहिताकरीता जागृत असलेली व झटणारी काही मोजकी माणस बालवयापासून बालकांच्या मनावर सुसंस्कार पडावेत म्हणून जिव ओतून बालसुसंस्कार शिबीरे आयोजीत करुन एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हा एक आशेचा किरण आहे.
श्रीगुरुदेव बालसुसंस्कार शिबीरे, वारकरी संप्रदाय आयोजित बालसुसंस्कार शिबीरे ही आपल्यासमोर आदर्श उदाहरणे आहेत.
अशा चांगल्या उपक्रमांना आजकाल राजाश्रय नाही परंतु लोकाश्रयातून असी शिबीरे आयोजन करण्याकरीता समाजाची चिंता असणाऱ्या काही व्यक्ती धडपडतांना दिसतात. अशांना बळ पुरविने ही समाजातील सुज्ञ लोकांची जबाबदारी असते.आपल्या लेकरांचे संगोपन जरुर लाडाकौतुकाने करावेच पण समाजातील सुज्ञ व आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या लोकांची लेकरं जर अशा संस्कार शिबीरांच्या माध्यमातून सुसंस्कार ग्रहण करणार असतील अशा लेकरांसाठी आपल्या लेकरांच्या घासातील एक घास आपण त्यांच्या मुखात घालायला काय हरकत आहे?
लग्नकार्यादी प्रसंग,वाढदिवस, अनावश्यक कर्मकांड, ढोंगी बुवाबाबांच्या नादी लागुन व्यर्थ उधळले जाणारे धन यातील काही वाटा जर आपण या लेकरांसाठी दिला तर मला वाटते नक्कीच पुण्य पदरांत पडेल व आपल्या कुटुंबात सुख समृध्दी व शांती नांदेल
🙏🏻जयगुरु🙏🏻
माधवराव काळे
मुर्तिजापूर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!