Saturday, April 5, 2025
Homeविद्यार्थी हितसामान्यज्ञान प्रश्नावली भाग-11

सामान्यज्ञान प्रश्नावली भाग-11

सामान्यज्ञान प्रश्नावली

 (1) ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात?

उत्तर — पौर्णिमेची रात्र

(2) भारतीय सौर वर्षाचे महिने किती?

उत्तर — बारा महिने

(3) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती?

उत्तर — बारा महिने

(4) आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

उत्तर — पृथ्वी

(5) पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो?

उत्तर — सूर्यापासून

(6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता?

उत्तर — पृथ्वी

(7) पृथ्वीवर किती टक्के भूभाग आहे?

उत्तर — २९ %

(8) पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे?

उत्तर — ७१ %

(9) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते?

उत्तर — पश्चिम

(10) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते?

उत्तर — उत्तर

(11) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती?

उत्तर — पूर्व

(12) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती?

उत्तर — पश्चिम

(13) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळाला काय म्हणतात?

उत्तर — दिन

(14) सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात?

उत्तर — रात्र

(15) दिन व रात्र मिळून एक पूर्ण काय होतो?

उत्तर — पूर्ण दिवस

(16) इंग्रजी वर्षाप्रमाणे ३१ दिवसांचे महिने किती?

उत्तर — सात

(17) मराठी वर्षांची सुरूवात कोणत्या महिन्याने होते?

उत्तर — चैत्र

(18) आंब्याच्या बीला काय म्हणतात?

उत्तर — कोय

(19) फणसाच्या बीला काय म्हणतात?

उत्तर — आठळी

(20) कापसाच्या बीला काय म्हणतात?

उत्तर — सरकी

(21) चिंचेच्या बीला काय म्हणतात?

उत्तर — चिंचोका

(22) कोणत्या फळापासून आमरस तयार होतो?

उत्तर — आंबा

(23) कोंबड्याच्या डोक्यावर काय असते?

उत्तर — तुरा

(24) चिंचेची चव कशी असते?

उत्तर — आंबट

(25) आवळ्याची चव कशी असते?

उत्तर — तुरट

(26) कारल्याची चव कशी असते?

उत्तर — कडू

(27) मीठाची चव कशी असते?

उत्तर — खारट

(28) साखरेची चव कशी असते?

उत्तर — गोड

(29) पारंब्या कोणत्या झाडाला असतात?

उत्तर — वड

(30) झुरळाला पाय किती असतात?

उत्तर — सहा

(31) पोळा सणाला कोणत्या प्राण्याची पूजा करतात?

उत्तर — बैल

(32) तबेल्यात कोणाला बांधतात?

उत्तर — घोडा

(33) सजीवांचे किती गट आहेत?

उत्तर — दोन

(34) सजीवांचे दोन गट कोणते?

उत्तर — प्राणी व वनस्पती

 (35) कोळी किड्याला किती पाय असतात?

उत्तर — आठ

 (36) वनस्पतीची मुळे कोठे असतात?

उत्तर — जमिनीत

 (37) जिभेचा कोणता रंग चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे?

उत्तर — गुलाबी

 (38)श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात?

उत्तर –ऑक्सिजन वायू

 (39) मेंदू कोठे असतो?

उत्तर — डोक्याच्या कवटीत

(40) जिल्हयाचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो?

उत्तर — जिल्हा अधिकारी (कलेक्टर )

(41) भारतीय संविधान केव्हापासून लागू करण्यात आले?

उत्तर — २६ जानेवारी १९५०

(42)भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील?

उत्तर — केशरी, पांढरा, हिरवा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!