एवढ्या मानधनात किती कामं? ऑनलाइन अर्ज भरणार नाही !
अंगणवाडी सेविकांचा निर्धार; App ओपन होईना.. सेविका वैतागल्या
नारी शक्ती App ओपन होईना.. सर्वर डाऊन कागदपत्र अपलोड करण्यास लागतोय वेळ. अपूर्ण कागदपत्र.. अंगणवाडीच्या मूळ कामांकडे होत असलेले दुर्लक्ष अशा एक ना अनेक तांत्रिक समस्येने अंगणवाडी सेविका वैतागल्या असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास राज्य कृती अंगणवाडी समितीने विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात लवकरच राज्यभर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा इशारा अंगणवाडी कृती समितीने घेतला आहे. ऑनलाइन अर्ज भरणार नाही, ऑफलाइन अर्ज भरून प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देऊ, असे अंगणवाडी सेविका संघटनेने कळविले आहे.
‘लाडकी बहीण योजनेच्या कामांचा व्याप अंगणवाडीताईंवर टाकण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातून विरोध होत आहे. अंगणवाडीताईंच्या मानधनवाढीचा विचार राज्य सरकार मागील दहा वर्षांपासून करीत नाही.