Monday, December 23, 2024
HomeNEWSलाडकी बहीण योजनेचा प्रारंभ पुण्यातून

लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ पुण्यातून

लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ पुण्यातून

दोघींनी भरले अर्ज, मंत्री गिरीश महाजन उपस्थित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात अर्ज करण्यास सुरुवात झाली असून सोमवारी (दि. १) आशा पातोंड व स्नेहलता यनभर या दोघींचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारण्यात आले.
जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्याचा प्रारंभ ग्रामविकास व पंचायतराजमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
राज्यातील २१ ते ६० वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसलेल्या महिलांना ही योजना लागू असून या योजनेंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपये दरमहा लाभार्थी महिलेच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्य शासन समाजहिताच्या अनेक योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक पात्र भगिनींना लाभ होईल असे महाजन यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेतर्फे या योजनेअंतर्गत १०० लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. १५ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!