इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही
प्राप्तिकर विभागाचे संकेत
आयटीआर फायलिंगची शेवटची तारीख वाढवली जाणार नसल्याचे संकेत प्राप्तिकर विभागाने दिले आहेत.
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख दरवर्षी ३१ जुलै ही असते. अपवादात्मक परिस्थितीत ही तारीख वाढवली जाते. यंदा अनेक करदात्यांना ई-फायलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तशा
तक्रारीही केल्या जात आहेत. मात्र, तरीही यंदा इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची शेवटची तारीख वाढवली जाणे शक्य नसल्याचे समजते.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलैपर्यंत ४ कोटी लोकांनी आयटीआर दाखल केले होते. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत तुलनेने कमी लोकांनी आयटीआर भरला होता.