पेसा क्षेत्रातील शाळांमधील रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षकांची होणार भरती
/////////सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य, वीस हजार मानधन देणार///////
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने मागील अनेक वर्षांपासून पेसा क्षेत्रातील शिक्षकांसह इतर पदांवरील भरती प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना सोमवारी दि. १५ रोजी पत्र पाठविले.
त्यामध्ये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती द्यावी.
टेट – २०२२ शिफारस पात्र उमेदवारांना संधी द्यावी आणि त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातींद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी, असे नमूद केले आहे.

AI Image