वन महोत्सव सप्ताह- पर्यावरणपुरक अनेक उपक्रमांनी साजरा
धारणी- मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा यांचे अधीनस्त, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय धारणी व सुसर्दा यांनी दिनांक 01 जुलै ते 7 जुलै 2024 दरम्यान वन महोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात व पर्यावरण पूरक अनेक उपक्रम घेऊन साजरा केला या वनमहोत्सवामध्ये धारणी व सुसर्दा परिक्षेत्रांतर्गत विविध स्पर्धा तसेच रॅली, Run4nNature, nature Trail, स्वच्छता अभियान इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते.
या वनमहोत्सव सप्ताहाची सांगता आज करण्यात आली असून वन महोत्सवच्या शेवटच्या दिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत धारणी येथील कराटे संघ यांनी प्रात्यक्षिक सादर करून केले त्याचबरोबर आदिवासी भागातील सांस्कृतिक नृत्य ‘गदली नृत्य’ आदिवासी गदली संघाने पारंपारिक आपली वेशभूषा परिधान करून सर्व मान्यवरांचे स्वागत जल्लोषात केले.
या कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थी, वयोवृद्ध, बालक, पुरुष, महिला सर्वांनी निसर्गासाठी प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला सदर स्पर्धेत विजेतेपद जिंकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पुढील पिढीस पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे का गरजेचे आहे हे पटवून देणे आवश्यक असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच समाजातील सर्व घटकांनी आपले समाजाप्रती काही देणे लागतं या उद्देशाने वृक्षारोपण व वृक्षांचे संवर्धन करत राहणे किती आवश्यक आहे हे या सात दिवसाच्या वन महोत्सवाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
यास्तव या उपविभाग धारणीद्वारे आयोजित स्पर्धेत विजेते पद मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला, तसेच त्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक वाटप कार्यक्रमाला उपस्थिता सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वन महोत्सव सप्ताह समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजकुमार पटेल, मा.श्री.अग्रीम सैनी (भारतीय वन सेवा) उपवनसंरक्षक, मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा, मा.श्री.सुहास चव्हाण (भारतीय वन सेवा) सहा. संरक्षक अतिक्रमण निर्मूलन परतवाडा, मा.श्री.महादेव कोळी सर न्यायाधीश धारणी कोर्ट-1, मा.श्री.चव्हाण सर न्यायाधीश धारणी कोर्ट-2, मा.श्रीमती मंदोदरी वाकोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.आयुष कृष्णा, (भारतीय वन सेवा) वनपरिक्षेत्र अधिकारी, धारणी, सूत्रसंचालन कु. शुभांगी डेहनकार (वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा), आभार प्रदर्शन-कु.पुष्पा सातारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी धारणी, अति. कार्य सहाय्यक वनसंरक्षक धारणी यांनी केले त्याचप्रमाणे दिनांक 01 ते 07 जुलै 2024 या कालावधीत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय सहभाग व मोलाचे योगदान देणारे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले
कार्यक्रमाचे नियोजन तथा आयोजन कार्य करणारे अधिकारी /कर्मचारी वनपाल-कु.रुपाली येवले, श्रीमती स्मिता वाहणे, श्री. जाकीर पटेल, श्री. पंकज भुगुल, श्री.गजानन चव्हाण, लिपिक-श्री. शरद बनकर, वनरक्षक– श्री.चंद्रशेखर थोटे, श्री.नितीन कांबळे, श्री.राजकुमार उईके, कु.रंगीता भिलावेकर, वर्ग4-श्री अब्दुल रहमान तसेच इत्यादी मुख्य नियोजन तसेच कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी इतर सर्व धारणी व सुसर्दा येथील अधिकारी/कर्मचारी व वर्ग-4 मधील कर्मचारी व कंत्राटी मजूर यांनी कार्यक्रमास दिलेले मोलाचे योगदान या मुळेच धारणी तालुक्यात प्रत्येक घरात एक तरी झाड पोहचले या साठी केलेली जनजागृती याबाबत सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वनमहोत्सव जरी संपला असला तरी झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ती गरज म्हणून करण्यापेक्षा जवाबदारी म्हणून आठवड्यातून एक तरी झाड लावुन केले तर आजच्या सुखापेक्षा पुढील पिढीला मिळणारे सुख तुम्हाला लाभेल. हाच मोलाचा संदेश घेऊन आपण येथेच थांबू या.
धन्यवाद !!