Friday, April 18, 2025
Homeशैक्षणिक न्युजपहिल्या वर्गातील चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने गेला जीव

पहिल्या वर्गातील चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने गेला जीव

पहिल्या वर्गातील चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने गेला जीव

स्वच्छतागृहात दुर्घटना : गावकऱ्यांचे रुग्णालयासमोरच ठिय्या

लाखांदूर (जि. भंडारा) : पहिल्या वर्गात मोठ्या उत्साहाने तिने पाऊल ठेवले; पण सत्राच्या तिसऱ्या दिवशीच शाळेच्या गलथानपणामुळे तिचा जीव गेला. स्वच्छतागृहात पडून असलेल्या ॲल्युमिनियम क्वॉईल्ड वायरच्या स्पर्शामुळे विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. यशस्वी सोपान राऊत (६ वर्षे), असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी १०च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली.अन्य विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
गावकऱ्यांची गर्दी आणि आक्रोश पाहता गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. यशस्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.

शाळेचा निव्वळ गलथानपणाच!

जिवंत वीजप्रवाह असलेला वायर पडून असल्यानेच ही दुर्घटना घडली, त्यामुळे शाळेचा गलथानपणाच समोर आला आहे. 1. ॲल्युमिनियम क्वॉईल्ड वायर बेवारसपणे स्वच्छतागृहातच कशी?
2. त्यात विजेचा प्रवाह कसा? कधीपासून होती?
3. याकडे कुणाचे लक्ष का गेले नाही?
4. सॅनिटरी पॅड मशीनसाठी लावलेला विजेचा बोर्डही उघड्यावर असल्याने पावसात धोका होऊ शकतो, हे कुणाच्या लक्षात का आले नाही?
असे अनेक प्रश्न या घटनेमुळे समोर येतात.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!