Friday, April 18, 2025
Homeलाभाच्या योजनाइयत्ता नववी व दहावीतील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

इयत्ता नववी व दहावीतील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

 इयत्ता नववी व दहावीतील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

योजनेचे स्वरुप :- 

                            मान्यता प्राप्त अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळेत इ. ९ वी व १० वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देय आहे. ही गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहिल.
अटी व शर्ती :- 
 १. सदर शिष्यवृत्तीकरीता वार्षिक उत्पन्न रु.२.०० लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
२. जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
३. राष्ट्रीयकृत बॅकेत विद्यार्थीचे खाते असणे आवश्यक आहे.
४. शाळेतील नियमित उपस्थित आहे.
लाभाचे स्वरुप :-
इ. ९ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना (अनिवासी) प्रति महा रु.१५०/- (१० महिनेसाठी ) व (निवासी) प्रति महा रु.३५०/- (१० महिनेसाठी ) पुस्तके व तदर्थ अनुदान (वार्षिक) अनिवासी रु.७५०/- व निवासी रु.१,०००/-
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!